All in one Daily Journal - Dainandini

0

 

All in one Daily Journal - Dainandini

This is a Gratitude, Mind calming, Daily planning and learning Journal, All in one journal.

Non Dated , so that you even if you miss a day you wont miss a page 

The human mind is the most powerful organ. Nothing is impossible for a person who has control over the mind to achieve. But controlling the mind is not that easy. Mind likes to wander everywhere, to think only what we dont want. Even if you don't want to remember, you get stuck in old memories, otherwise you worry about what will happen in the future. But all this makes us think that it is difficult to control the mind. The mind is not to be controlled but the mind is only to be guided. The mind needs to be fed well to think and that is what this JOURNAL is for.

मराठी मध्ये देखील उपलब्ध 

हेलो, आज मला माझे स्वप्न तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचे आहे.

जीवन सोपे, आनंदी आणि शांत कसे करता येईल ह्याचा मार्ग शोधण्यावर माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी माझ्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. आणि मला माहीत आहे की अडथळे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. पण मी सतत काळजीत असायची आणि आयुष्याचा पूर्ण आनंद घेतच नव्हती. आणि मला ते आवडत नव्हते कारण मला आनंदी राहायला आवडते. त्अर्थात ते कोणाला नाही आवडत. यामुळे अनेक मार्गांचा शोध घेतल्यानंतर मला जर्नलिंगची (म्हणजे रोजनीशी लिहीणे) विषयी माहीती मिळाली. आणि दैनंदिन जर्नलिंगने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला. दोन बाळांसह, ऑफिस चे काम आणि घरगुती काम हया सगळ्यात सुद्धा मी शांत आणि आनंदी व्यक्ती होऊ शकले ते केवळ जर्नलिंगमूळे. कामावर माझी उत्पादकता देखील वाढली. तसेच मी माझे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने काम करत होतो. तसेच, माझ्या आजूबाजूच्या लोकांशी असलेल्या माझ्या नातेसंबंधाची गुणवत्ता वाढली. रोजच्या 10 मिनिटांच्या जर्नलिंगने माझे आयुष्य जादूची छडी फिरवल्या प्रमाणे बदलले.आणि हे सर्व मला जे लोक माहीतीये त्या सर्वांसोबत शेअर करायचे आहे. माझे सर्व प्रियजन जीवनात इतके आनंदी आणि निवांत असावेत असे माझे स्वप्न आहे. कारण प्रत्येकजण सुंदर जीवनासाठी पात्र आहे. म्हणूनच मी एक जर्नल तयार केली आहे जी तुम्हाला हे सुंदर जीवन जगू देईल.

हे एक मार्गदर्शित जर्नल आहे ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या प्रॉम्प्ट्सची उत्तरे लिहायची आहेत. हे प्रॉम्प्ट तुम्हाला विचार करायला लावतील आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडतील. हे प्रॉम्प्ट तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे बदलतील.

हे जर्नल लहान मुले किंवा वृद्ध कोणीही वापरू शकते. व्यावसायिक एक्झिक्युटिव्ह पुरुष ते महिलांपर्यंत. माझ्या 5 वर्षाच्या मुलीला हे प्रश्न मी विचारते आणि तिच्यासाठी उत्तरे लिहीते आणि माझी 58 वर्षांची आई देखील या जर्नलिंगद्वारे तिच्या या नवीन मानसिकतेचा अनुभव घेत आहे.

हे "ड्रीम लाईफ जर्नल" इंग्रजी आणि मराठीत "दैनंदिनी" या नावाने उपलब्ध आहे.

लिंक्स पुढे सामायिक केल्या आहेत कृपया आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी ऑर्डर करा 

CLICK HERE TO BUY

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
Contact Me