बारामती इको सिस्टिम - बायोगॅस सयंत्र

0

 

Baramati Eco System


बारामती इको सिस्टिम्सचे आधुनिक बायोगॅस संयंत्र सेंद्रिय शेती करणार्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे ...!!!

आमचं काम : पार्श्वभूमी

  • आपल्या शेतकऱ्यांचे जीवन सुकर करायचे या उद्देशातून साकार झालेली कल्पना.
  • १३ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग टाईप बायोगॅस’चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले
  • या उत्पादनास एम एन आर इ मिनस्ट्री ऑफ न्यू ॲड रिनिवेबल एनर्जी भारत सरकारची मान्यता
  • अशा प्रकारच्या बायोगॅस संयंत्रास केंद्र सरकारचे अनुदान
  • भारतामधून एकुण ४० कंपन्यांचे केंन्द्रसरकारकडे अर्ज त्यामध्ये फक्त सात कंपन्यांची निवड करण्यात आली.
  • आत्तापर्यंत नामांकित कंपनीचे १० ते १२ हजार बायोगॅस राज्यात बसवले, ते अजूनही कार्यरत.
  • उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आमच्या बायोगॅस संयत्राची चाचणी चालू आहे
  • महाराष्ट्रामध्ये बायोगॅस सयंत्र बनवणारी आमची पहिलीच आणि एकमेव कंपनी आहे

बायो गॅस (जैविक वायू) म्हणजे नक्की काय ?


  • जनावरांचे शेण ( घरातील ओला कचरा), पोल्ट्री वेस्ट अशा सेंद्रिय पदार्थांना बंदिस्त घुमटात कुजवून त्यापासून तयार होणाऱ्या वायू म्हणजेच बायोगॅस.
  • हवेपेक्षा हलका
  • मिथेन वायू ५० ते ७५% असतो
  • निळ्या ज्योतीने जळतो
  • एलपीजीला पर्याय, पर्यावरणपूरक.
  • ग्रामीण भागात अतिशय उपयुक्त
  • पारंपरिक ऊर्जा साधनावरचा भार हलका करतो.
  • कार्बनडायऑक्सीडचे प्रमाण २५ ते ५० टक्के.
  • बायोगॅसच्या वापरामुळे- ग्रामीण भागातील स्त्रियांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा त्रास वाचतो, जीवनमान सुधारते.
  • साधारण २ घनमीटरच्या बायोगॅसपासून ४ ते ५ मेट्रिक टन सेंद्रिय खत मिळते
  • हेच खत शेतात वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
  • बायोगॅस मधील स्लरी शेतामध्ये खत म्हणून वापरल्यास शेतामध्ये तण उगवत नाही यामुळे तन काढण्याच्या खर्चात बचत होते तसेच वेळही वाचतो

बायोगॅसची स्लरी म्हणजे नक्की काय ?

  • स्लरी म्हणजेच मळी ही जीवाणूंनी सेंद्रिय मालाचे अवायुजीवी विघटन केल्यावर तयार होणारे उपउत्पादन आहे.
  • स्लरीमधील महत्त्वाचे घटक :
  • १. नत्र- १.५ ते २ %
  • २. स्फुरद- १ %
  • ३. पालाश- १ %

बारामती इको सिस्टिम्स चा एकच ध्यास ! बळीराजाचा सर्वांगीण विकास !

Baramati Eco System



#BaramatiEcosystems #BiogasPlant #SustainableFarming #SlurryManagement #OrganicFarming #Farmers #Biodiversity #Agriculture #GreenEnergy #FarmLife #FarmersOfIndia




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
Contact Me